आम. नितेश राणे मतदार संघात राबविला जाणार उपक्रम.
आमदार नितेश राणे यांनी शाळांना”सोलर पॅनल”च्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याची संकल्पना मांडली आहे. या कामाला युद्ध पातळीवर गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्वे करण्याचे काम सुरू केले आहे. दोन अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांसह सर्वे करत आहे.इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि सोलर पॅनल विभागाचे प्रमुख गोविंद ढोले, सौरऊर्जा विभागाचे इंजिनिअर ईशान शहाडे यांच्या उवस्थितीत हे सर्वेचे काम सुरू आहे. आज ३१ ऑगस्ट रोजी टाटा पॉवरच्या या अधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची प्रहार भवन येथे भेट घेतली आमदार नितेश राणे यांनी सोलर पॅनलच्या माध्यमातून शाळांना सौरऊर्जा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.जेणेकरून शाळांना अखंडीत वीज पुरवठा होईल. त्याच प्रमाणे वीज विलापोटी शाळांचा होणारा खर्च कमी होईल. या पूर्वी आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील शाळा डिझिटल करू यशस्वी उपक्रम राबविला आहे त्याच पद्धतीने हा दुसरा उपक्रम आहे. समाज शिक्षणातून घडतो आणि हे शिक्षण दर्जेदार असावे त्यासाठीच्या सर्वतोपरी सुविधा शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यावर आम. नितेश राणे यांचा भर आहे.