आसोली हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत बर्डे हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान विषय शिक्षक विष्णू रेडकर यानी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. हायस्कूलचे मुख्याध्यापक विशाखा वेंगुर्लेकर यानी बर्डे यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देताना त्यांच्या अनेक गुणांचा पैलू उलगडले.शाळेच्या सुरूवाती पासून शाळेच्या उज्वल परंपरेविषयी त्यानी घेतलेली मेहनत,आपल्या प्रतिभासामर्थ्याने संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय लेखनातून केला.इतरांना मदतीचा हात पुढे केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श क्लार्क म्हणून त्यांचा लौकिक आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणा-या योजनांचा लाभ करून दिला.
या सत्कार समारंभाला शिरोडकर, भावना धुरी ,जाधव,सावळाराम जाधव, पाटकर,प्रमोद धुरी,टाक हायस्कूलचे कर्णीकर,संतोष बर्डे,विनय बर्डे,बर्डे परिवार उपस्थित होते.या सोहळ्यास माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर,सीमा सावंत,संस्थेचे सदस्य विजय धुरी यानी शुभेच्छा दिल्या.