अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर यांनी याआधीही सावंतवाडी पोलिस स्टेशनमध्ये सेवा बजावताना उत्तम कार्य केले होते. आज सिंधुदुर्गनगरी मध्ये पोलिस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांच्या हस्ते महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.