दोडामार्ग शहरात कोरोनाचा विळखा वाढतच आहे मागच्या तीन ते चार दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोरोनाची साखळी तोडायची असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नसताना घराबाहेर पडू नये तर व्यापारी वर्गाने पुढचे काही दिवस बाजारपेठ बंद ठेवावी असे आवाहन उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार सध्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यातच दोडामार्ग शहरात मुख्य बाजारपेठेत रुग्ण आढळून आले आहेत व्यापारी वर्गाने पुढचे काही दिवस दुकाने बंद ठेवावी आणि कुणालाही ताप खोकला अथवा इतर लक्षणे दिसून आल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.