संतापजनक! अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर केला बलात्कार; पुणे हादरले

संतापजनक! अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर केला बलात्कार; पुणे हादरले

पुण्यातील डेक्कन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला दारू पाजल्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे.

 पुणे: अल्पवयीन मुलीला दारू पाजून ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. डेक्कन परिसरातील या घटनेने पुणे हादरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या १६ वर्षीय मुलीबरोबर आरोपी साहिल याची ओळख झाली होती. त्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये नेले. त्या ठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

 

अभिप्राय द्या..