घरात घुसून गावातील तरुणाने छेड काढल्यानंतर वाद झाला. त्यामुळे बदनामी होईल या भीतीने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमध्ये ही घटना घडली.

शाहजहांपूर: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही मोहीम अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका तरुणीने छेडछाडीला वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूण घरात घुसला आणि तरुणीची छेड काढली. तिच्या आईने आरडाओरड केल्यानंतर तो पसार झाला, असा आरोप आहे. तिचे कुटुंबीय तक्रार करण्यासाठी त्याच्या घरी गेले असता, त्यांच्याशी वाद घातला. बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कांट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी रात्री १८ वर्षीय तरुणी आणि तिची आई घरात होती. त्याचवेळी गावातील एक तरूण त्यांच्या घरात घुसला आणि तरुणीची छेड काढली. तिच्या आईने आरडाओरड केल्यानंतर तरूण पसार झाला. पीडितेच्या आईने याबाबत तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली असता, त्यांनी वाद घातला. वाद झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले, असा आरोप आहे.

तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत तरुणीच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी तरुणासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page