ठाणे: डोंबिवलीतील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिक्षकावर असून, मुंब्रा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७ वर्षीय विद्यार्थी दिव्यात राहत होता. १४ फेब्रुवारी रोजी त्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले होते. विद्यार्थी डोंबिवलीत एका महाविद्यालयात शिकत होता. तर आरोपी हा वर्गशिक्षक आहे. त्याने विद्यार्थ्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीत तर नापास करण्याची धमकी दिली होती, असा आरोप आहे. धमकी आणि मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याचा आरोप शिक्षकावर आहे. या शिक्षकाविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.