मुंबई : जगभरात वर्षभरानंतरही कोरोना विषाणूचा  कहर जारी आहे . या महामारीच्या कारणांची माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शोध, अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासात कोरोना कुठल्या कारणांमुळे पसरतो आणि त्याचा शरीरावर कुठला परिणाम होतो याचे अनेक दावे पुढे आले आहेत.
नुकत्याच एका अभ्यासानुसार, अविवाहित लोकांना कोरोना विषाणुची लागण होण्याची शक्यता जास्त असते, असा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात असते.

अविवाहित लोकांच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना कोरोना होण्याची भीती अधिक असते. कारण, अविवाहित लोकांमध्ये रोग प्रतीकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. रोगप्रतीकारक शक्ती कमकुवत असल्याने अविवाहित लोकांना व्हायरल इन्फेक्शनही लवकर होते, असंही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

लोकांना लग्न का नाही करायचं आहे?
आजारी असल्याने अविवाहित लोकांच्या मानसिकतेवरही मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांचा रिलेशनशीप किंवा लग्नात इन्टरेस्ट कमी होतो, असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

स्वीडनच्या विद्यापिठात ऑफ स्टॉकहोममध्ये कोरोना संसर्ग झालेल्या लोकांमध्ये आर्थिक, मानसिक आणि शारिरीक परिस्थितींमुळे त्यांच्या लाईफस्टाईलवर काय परिणाम होतो, यावर संशोधन केलं जात आहे.

संशोधकांच्या मते, विवाहित लोकांच्या तुलनेत अविवाहित लोकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असतो. शिक्षणाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ते एकटे पडतात.

या अभ्यासामुळे भारतावर काहीही परिणाम होणार नाही. कारण, भारतात जरी शिक्षणाची कमतरता आणि आर्थिक अडचण असणारी लोकं असली, तरी कुटुंब परंपरेमुळे ते कुटुंबातील सदस्यांसोबत जोडलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page