भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी १९९ रुपयांचा एक नवा प्लान लाँच केला आहे. या प्लानध्ये बीएसएनएलच्या युजर्संना रोज डेटा सोबत फ्री कॉलिंग आणि फ्री SMS देणार आहे.

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या युजर्संसाठी एक नवीन प्लान लाँच केला आहे. १९९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी रोज डेटासोबत फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस सुद्धा देत आहे. कंपनीने या प्लानला पीव्ही १८६ ज्या जागी लाँच केले आहे. १९९ रुपयांच्या पीव्ही १८६ च्या तुलनेत दोन दिवसांची जास्त वैधता दिली आहे. तसेच बीएसएनएलने आपल्या ९९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा वाढवला आहे. जाणून घ्या नवीन प्लान संबंधी.

 

१९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट
३० दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा ऑफर करीत आहे. १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये कॉलिंग साठी रोज २५० मिनिट मिळतात. कंपनीचा हा नवीन प्लान २४ डिसेंबर पासून सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

कंपनीचा पीव्ही १८६ प्लान आता बंद करण्यात आला आहे. २८ दिवसांची वैधता आणि २ जीबी डेली डेटा देणाऱ्या या प्लानला १ जानेवारी पासून बंद करण्यात येणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० फ्री एसएमएस सोबत येत होता.

 

९९८ रुपयांच्या प्लानमध्ये आता रोज १ जीबी एक्स्ट्रा डेटा
१९९ रुपयांच्या प्लानला लाँच करण्यासोबतच कंपनीने ९९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या डेली डेटाला १ जीबी ने वाढवले आहे. आता या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. याआधी केवळ २ जीबी डेटा मिळत होता. प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळण्याची सुरुवात २४ डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page