कुडाळ /-
तेर्सेबांबर्डेचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार दि १६ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त दिवशी मंदिरात नारळ ठेवणे, देवाला केळी ठेवणे, तसेच ओटी भरणे यासारखे कार्यक्रम दिवसभरात होणार आहेत .यानंतर रात्री पालखी प्रदक्षिणा व खानोलकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे . तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.