हायवे ठेकेदाराच्या मुजोरी विरोधात १६डिसेंबर रोजी नांदगाव येथील नलावडे कुटुंबीयांचे साखळी उपोषणा

हायवे ठेकेदाराच्या मुजोरी विरोधात १६डिसेंबर रोजी नांदगाव येथील नलावडे कुटुंबीयांचे साखळी उपोषणा

आचरा /-

हायवे ठेकेदाराने मुजोरी करत मनमानी पणे हायवे साठी संपादीत जागेच्या बाहेर जात उत्खनन करून नुकसान केल्या विरोधात नांदगाव येथील नलावडे कुटुंबीय बुधवार १६डिसेंबर रोजी साखळी उपोषणास बसणार आहेत.

या बाबत रोहन प्रकाश नलावडे यांनी शासनास दिलेल्या निवेदनानुसार हायवे साठी संपादीत केलेली २३५३-१/२ही जागा वैयक्तिक मालकीची असून या वहिवाटीत राहते घर आहे. या लगतच हायवे संपादन झाले आहे.मात्र हायवे ठेकेदाराने हद्दीच्या बाहेर येत कोणतीही पुर्व कल्पना न देता घराच्या बाजूने उत्खनन करत झाडे व मालमत्तेचे नुकसान केले आहे.घराकडे जाणारा रस्ताही निट ठेवला नाही आहे. या बाबत प्रशासकीय अधिकारयांना फोनवरून,प्रत्यक्ष भेटूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नलावडे कुटुंबीयांकडून बुधवार १६ डिसेंबर रोजी साखळी उपोषण केले जाणार आहे.

अभिप्राय द्या..