दोडामार्ग /-
गेल्या काही दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावचे सरपंच लखु खरवत यांना कनिष्ठ अभियंता जीवन चराटे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती यासंबंधी महाराष्ट्र क्रांती संघटना जिल्हा अध्यक्ष संदेश वरक यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे एखाद्या अधिकाऱ्याकडून अशी अपमानास्पद वागणूक मिळाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही तर त्याचे सडेतोडपणे उत्तर दिले जाईल तसेच संपूर्ण महाराष्ट्र क्रांती संघटनेचा साटेली-भेडशी सरपंच लखु खरवत यांना जाहीर पाठिंबा आहे असेदेखील त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.