बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला पुन्हा एनसीबी (NCB)ने समन्स बजावला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तपास करताना बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. याच प्रकरणी अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करणार आहे. १६ डिसेंबरला अर्जुन रामपालला एनसीबीसमोर हजर व्हायचे आहे. यापूर्वी देखील अर्जुन रामपालची एनसीबीने चौकशी केली होती.
याप्रकरणी माझा काहीही संबंध नाही – अर्जुन
१३ नोव्हेंबरला एनसीबी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर अर्जुन पाल म्हणाला होता की, ‘कोणत्याही निर्दोषाची प्रतिष्ठा नष्ट करणे चुकीचे आहे. माझा ड्रग्जसोबत काहीही संबंध नाही आहे. पण याप्रकरणी एनसीबी जे काम करत आहे ते बरोबर आहे. ज्या प्रकरणाची एनसीबी चौकशी करत आहे, याप्रकरणी माझा काहीही संबंध नाही आहे, याची एनसीबीला खात्री झाली आहे.’
रामपालच्या मित्राला केली अटक, तर गर्लफ्रेंडची केली चौकशी
याआधी एनसीबी अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले होते की, ‘अर्जुन रामपालचा विदेशी मित्र पॉल गियर्डला एनसीबीने अटक केली आहे. १२ नोव्हेंबरला एनसीबीच्या एका टीमने गियर्डने अटक केली आहे.’ यापूर्वी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रायडिस सलग दोन दिवस चौकशी केली होती.
रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावालाही अटक
९ नोव्हेंबरला एनसीबीने छापेमारीदरम्यान अर्जुन रामपालच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट यांसारखे गॅजेट जप्त केले होते आणि अर्जुनच्या ड्रायव्हरची देखील चौकशी केली होती. रामपालच्या घरावरील छाप्याच्या एक दिवसापूर्वी एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियादवालाच्या घरी गांजा जप्त केला होता आणि फिरोज नाडियादवाला याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले होते. याआधी गॅब्रिएलचा भाऊ अगिसियालोसच्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्ज मिळाल्यामुळे अटक केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, ‘गेल्या महिन्यात एनसीबीने ग्रॅबिएलचा भाऊ अगिसिलाओसा ड्रेमेट्रिएड्स एका ड्रग्ज प्रकरणात जवळच्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा स्थित असलेल्या एका रिसोर्टमधून अटक केली होती.’