१७ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलाने पोलिसांना फोन करून बॉडी बॅग घेऊया असे सांगितले. या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले .

कौटुंबिक वादामुळे हत्या करण्याच प्रकार आपल्या देशात सर्रासपणे घडत असतात. चाकू सुरीने हल्ला करून मारून टाकण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आबेत. पण अशा घटना फक्त आपल्या देशातच घडतात का ? देशाबाहेरही अशा घटना घडत आहेत. आपल्या आईवर ११८ वेळा चाकूने हल्ला करून तिची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार इग्लंडमधून समोर येत आहे. १७ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलाने पोलिसांना फोन करून बॉडी बॅग घेऊया असे सांगितले. या घटनेमुळे पोलीसही हैराण झाले आहेत.

इग्लंडच्या हैंपशायर इथे ही धक्कादायक घटना घडली आहे. रोवन थॉम्पसन असे त्या मुलाचे नाव आहे. सकाळी वॉकला जाऊन आलेली रोवनची आई जोआना थॉम्पसन हिच्यावर हल्ला करून तिची हत्या केली. जोआना ५० वर्षांची होती. रोवनने तिचा आधी तिचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. आईची हत्या केल्यानंतर रोवनने पोलिसांना फोन केला. अगदी शांतपणे हळू आवाजात त्याने ‘मी माझ्या आईला गळा दाबून तिला मारून टाकले त्यानंतर तिच्यावर धारदार चाकूने वार करून मी तिची हत्या केली आहे. तिला घेऊन जाण्यासाठी बॉडी बॅग घेऊन या’, असे रोवनने पोलिसांनी सांगितले. रोआनचा फोन आल्यानंतर पोलिसही चकीत झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली काही वर्षे रोवन त्यांच्या वडिलांसोबत वेगळा राहत होता. खूप दिवसानंतर रोवन त्याच्या आईला भेटायला आला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेस रोवन अगदी शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता नव्हती. रोवनचे मानसिक संतुलन ढासळल्याने त्याला काही दिवसापासून मेंटल हेल्थ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. रोवनने आईची हत्या करण्यापूर्वी तो आदल्या रात्री हॉस्पिटलमधून आईला भेटाण्यासाठी आला होता. या हत्येनंतर १७ वर्षांच्या रोवलला पोलिसांनी अटक करून त्याला पोलीस कोठडी सुनावली. घटनेच्या तीन महिन्यानंतर रोवनचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page