चिपी विमानतळ भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांना प्राधान्य द्या.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची आयआरबीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी..

चिपी विमानतळ भरती प्रक्रियेत स्थानिक युवकांना प्राधान्य द्या.;मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची आयआरबीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी..

कुडाळ /-

स्थानिक वृत्तपत्रे व सोशल मीडियावर चिपी विमानतळ 23जानेवारी 2021 रोजी कार्यान्वित होणार या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याअनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांसह सोमवारी चिपी विमानतळ येथे आय आर बी चे अधिकारी श्री लोणकर अमर पाटील एअर ट्राफिक कंट्रोल अधिकारी ,तसेच फायर सेफ्टी अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करीत लक्ष वेधले. यावेळी मनसेचे उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे सुबोध परब, समीर नाईक, सागर सावंत, आदी उपस्थित होते. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांन सह विमानतळ कामाची पहाणी करीत विविध मागण्या बाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यात प्रामुख्याने विमानतळ नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे , कंत्राटी कामगार भरतीच्या एजन्सीला स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी अट आयआरबीने करारात नमूद करावी, नोकर भरतीच्या जाहिरातींना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात यावी ,तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळा वरील हॉटेल व्यावसायिक, मालवण येथील पर्यटन संस्था, स्कूबा डायव्हिंग ,वॉटर स्पोर्ट, यांच्या संघटनांची ची संयुक्त बैठक घेऊन हवाई वाहतुकीसंदर्भात जनजागृती व जाहिरात करावी. जेणेकरून पर्यटकांचे हवाईमार्गे जिल्ह्यात येण्याचे प्रमाण वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. विमानतळाच्या बाहेरील रेंन्ट कॅब, टुरिझम गाईडस यामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य मिळावे, अशा आशयाच्या मागण्या जिल्हाध्यक्ष धीरज परब व शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांकडे केल्या. तसेच विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात अशा शुभेच्छा दिल्या. विमानतळ भरती प्रक्रिया ही पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे होणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांनी एजंट अथवा दलालांच्या आमिषांना बळी पडू नये. असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री परब यांनी केले आहे. दरम्यान दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेना व भाजप पक्षाच्यावतीने विमानतळ नोकर भरती च्या संदर्भात स्थानिकांना मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली होती .परंतु त्याचा स्थानिकांना कोणताही फायदा झालेला नाही. निवडणुकीच्या आधी अशा प्रकारची शिबिरे घेऊन केवळ राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला असे देखील परब म्हणाले.

अभिप्राय द्या..