नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चालू खात्यासंदर्भातील अनेक नियमांमध्ये बदल केलेत. आजपासून नवीन नियम अंमलात आलेत. नव्या नियमांनुसार 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक आणि पेमेंट बँकांसाठी परिपत्रक जारी केले होते, त्यामध्ये चालू खात्याबाबत काही आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु आता या खात्यांच्या नियमांमधून अनेकांना दिलासा मिळाला .
6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले होते. ज्यात असे सांगितले गेले होते की, RBI ने अनेक ग्राहकांना चालू खाती उघडण्यास बंदी घातली. ज्या ग्राहकांनी बँकिंग सिस्टममधून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात क्रेडिट सुविधा घेतली आहे, त्यांच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत.

नवीन परिपत्रकात काय बदल?
त्याशिवाय नवीन परिपत्रकानुसार, ज्या बँकेतून ते कर्ज घेत आहेत, त्याच बँकेत ग्राहकांना त्यांचे चालू खाते किंवा ओव्हरड्राफ्ट खाते उघडावे लागेल.

हा नियम का जारी केला?
ज्या ग्राहकांनी बँकेकडून 50 कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे, अशा ग्राहकांना हा नियम लागू होईल. रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की, ग्राहक अनेकदा एका बँकेतून कर्ज घेतात आणि दुसर्‍या बँकेत जाऊन करंट खाते उघडतात, असे अनेकदा पाहिले गेले आहे. असे केल्याने कंपनीचा रोख प्रवाह बऱ्याचदा खंडित होतो. म्हणूनच आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे की, अशा बँकेने रोख पत किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेतलेल्या अशा ग्राहकांचे चालू खाते उघडले जाऊ नये, अशा सूचना केल्या आहेत.

बँकांनीही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
चालू खाते उघडण्याच्या अटींमध्ये सवलत देण्याबरोबरच आरबीआयनेही ग्राहकांना सतर्क केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ही सूट केवळ अटींसह दिली जात आहे, त्यामुळे बँकेनेही याची काळजी घ्यावी. याशिवाय काही विशिष्ट व्यवहारासाठीच याचा वापर केला जाईल, असे बँका आश्वासन देतात. याखेरीज बँकेकडूनही याकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. आरबीआयने बँकांना नियमितपणे रोख पत/ओव्हरड्राफ्टवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page