रागाच्या भरात खून, आत्महत्या असे भयंकर प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला आहे.
मेरठ : कोरोनाच्या संकटात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. रागाच्या भरात खून, आत्महत्या असे भयंकर प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला आहे. एक हृदयस्पर्शी घटनेमध्ये कुत्र्याला जेवण न दिल्यामुळे निर्दयी भावाने आपल्या बहिणीला गोळ्या घालून ठार मारल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील मेरठ इथं हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आशिष असं आरोपी भावाचं नाव आहे. आशिष हा कैलास वाटिका, गंगासागर इथं श्वान सांभाळण्याचं काम करतो. सोमवारी रात्री आशिषने आपली मोठी बहीण पारुल हिला श्वानांना भाकर बनवण्यासाठी सांगितलं होतं. परंतु पारूलने यासाठी नकार दिला. यानंतर संतप्त आशिषने बंदुकीच्या गोळ्या झाडून बहीणीची हत्या केली. यामध्ये पारुलचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीने स्वत: दिली बहीणीच्या हत्येची कबुली
घटनेनंतर आशिषने स्वत: पोलिसांना याबद्दल माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले आणि बंदुकीसह त्याला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी आशिषकडे बंदूक आलीच कशी. ही बंदूक कोणाची आहे? बंदुकीचा अधिकृत परवाना आहे की नाही? याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी घटनास्थळावरून पारुलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आली आहे. तर घटनेविरोधात एफआयआय नोंदवून आरोपींविरूद्ध कारवाई केली जात असल्याचे एसपी ग्रामीण भागातील केशव कुमार यांनी सांगितले.