जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर सतिश सावंत यशस्वी
सिंधुदुर्गनगरी /-
सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात शेती पिक कर्ज वाटप करण्यासाठी संस्था नव्हती तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या आदेशामुळे संस्था स्थापन करण्यात आली होती मात्र सदर संस्था रजिस्टर्ड करतांना संस्थेचे वर्गीकरण उत्पादक संस्था व उपवर्गीकरण औद्योगीक संस्था असे होते.त्यामुळे शेती पिक कर्ज वाटप करतांना अडचणी निर्माण झाल्या.सन १९९६ मध्ये अेमओ यु समवेत जिल्हा बँकेत झालेल्या मिटीग मध्ये संस्थेच्या उपविधीत तरतुद नसली तरी विकास संस्थाप्रमाणे शेती कर्जवाटपाची मंजूरी देण्यात आली. मात्र संस्थेला २००८-९ नंतर औद्योगीक संस्थांना कर्ज माफी नाही या शासन निकषानुसार कर्ज माफी मिळाली नाही.मात्र शासन दरबारी केलेल्या पाठपुरवठ्या नंतर तसेच सहकार मंत्र्यांनी केलेल्या सुचनांनुसार तांत्रीक मुद्दे पूर्ण करून घेण्यात आले .त्यामुळे १२ नोव्हेबर २०२० रोजी संस्थेला विविध कार्य कारी सेवा सोसायटीचे नियम लागू करण्यात आले.व कर्ज माफी बाबत शिफारसही करण्या आली आहे.आता इतर ३ संस्था ज्या या वर्गीकरणात आहेत त्यांचा विकास संस्था म्हणून मान्यतेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.जिल्हा बँकेमार्फत केलेले प्रयत्न अखेर यशस्वी झाल्याचे सतिश सावंत यानी म्हटले आहे.