कुडाळ तालुका अल्प संख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार

कुडाळ तालुका अल्प संख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जेष्ठ नागरिकांचा सत्कार

 

कुडाळ तालूका अल्प संख्याकसेल तालुका अध्यक्ष श्री. बशीर खान यांच्या पुढाकाराने खा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त झाराप येथील १२ जेष्ठ नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर ता.अध्यक्ष भास्कर परब ओबीसी कार्याध्यक्ष नझीरभाई शेख. माजी महिला तालुका अध्यक्षा सौ.पूनम सावंत.प्रकाश सावंत.यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी झारापचे माजी सरपंच रामा पावसकर. मुश्ताक खान.घाडी.धूरी यांचेसह अन्य सत्कार मुर्ती उपस्थित होते. उपस्थितांना अध्यक्ष अमित सामंत. काका कुडाळकर. नझीर शेख यांनी मा.पवार साहेबांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रात महाराष्ट्र तसेच देशासाठी केलेल्या उत्तुंग कार्याची माहिती दिली. शेवटी उपस्थितांचे आभार प्रकाश सावंत मानले.

अभिप्राय द्या..