मुंबईतील धक्कादायक घटना, बॉलिवूड अभिनेत्रीला व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून

मुंबईतील धक्कादायक घटना, बॉलिवूड अभिनेत्रीला व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून

 

मुंबईत एका अज्ञात व्यक्तीकडून बॉलिवूड अभिनेत्रीला व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करुन हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अभिनेत्रीने याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षणही देणाऱ्या या ३२ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही.

अभिनेत्रीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दोन वेळा आपल्याला त्या क्रमांकावरुन फोन आला असता कट केला होता. युकेचा कोड असणाऱ्या या क्रमांकावरुन तिसऱ्यांदा फोन आला तेव्हा आपण चुकून तो स्वीकारला. यावेळी समोरील व्यक्ती हस्तमैथून करत होती. आपल्याला खूप मोठा धक्का बसला, मी त्याचे स्क्रिनशॉट घेतले आहेत.

यानंतरही अज्ञात व्यक्ती अभिनेत्रीला सतत मेसेज पाठवत होती. याशिवाय तिला नावाने हाक मारत होती. यानंतर अभिनेत्रीने ट्विटरच्या माध्यमातून आरोपीचे मेसेज आणि व्हिडीओ स्क्रीनशॉट शेअर केले. या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलिसांनाही टॅग केलं. आपण अडचणीत आल्याचं लक्षात येताच अज्ञात व्यक्तीने माफी मागत आपण २० वर्षीय विद्यार्थी असून चूक झाल्याचं म्हटलं.

आरोपीने आपले मेसेज आणि व्हिडीओ कॉल एका मैत्रीणीसाठी होते, तिच फोन क्रमांकही सारखाच असल्याचा दावा केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

अभिप्राय द्या..