आमदाराच्या वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

आमदाराच्या वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर किसन कथोरे किरकोळ जखमी झाले आहेत.
 
बदलापूर : मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे वाहन आणि एका दुचाकीचा रविवारी सायंकाळी कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर किसन कथोरे किरकोळ जखमी झाले आहेत.

आमदार कथोरे  टिटवाळा येथील पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून बदलापूरच्या दिशेने येत असताना रायते गावापासून काही अंतरावर असलेल्या छोटय़ा पुलावर त्यांचे चारचाकी वाहन आणि रायतेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की आमदार कथोरे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले तर दुचाकीचा पार चेंदामेंदा झाला. यावेळी दुचाकीवरील तरुण अमित सिंग (२२) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरूणी पुलावरून खाली फेकली गेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणण्यात आले होते. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. योगेश कापुसकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, आपल्या मानेला दुखापत झाली असून सुखरूप असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.

 

अभिप्राय द्या..