लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांचा ओव्हरडोस….

लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळयांच्या ओव्हरडोसमुळे एका युवकाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली. पंचवीशीतील या युवकाने एकाचवेळी १० गोळया खाल्ल्या. गोळया घेतल्यानंतर त्याला लगेच त्रास सुरु झाला. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासातून ही आत्महत्या असल्याचे समोर आले आहे.

मृत तरुणाने कुठलीही चिठ्ठी मागे सोडलेली नाही. त्यामुळे इतके टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय? ते अजून स्पष्ट झालेलं नाहि. मृत तरुण अविवाहित होता. तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. सात डिसेंबला या युवकाने लैंगिक उत्तेजना वाढवणाऱ्या गोळया खाल्ल्या. त्यानंतर लगेच त्याची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली.

अस्वस्थतात, चक्कर, उलटी, पोटात दुखणे असे त्रास त्याला सुरु झाले. तरुण जवळच्या डॉक्टरकडे गेला. त्याने काही औषधे दिली. पण तरुणाची प्रकृती ढासळतच होती. कुटुंबीय त्याला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. पण श्वसनाचा त्रास बळावल्यानंतर त्याला नऊ डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले. फॉरेन्सिक चाचणीसाठी त्याचा व्हिसेरा जपून ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांना वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page