धक्कादायक! लग्नाच्या भूलथापा देऊन मेव्हणीवर बलात्कार

धक्कादायक! लग्नाच्या भूलथापा देऊन मेव्हणीवर बलात्कार

तरूणाने लग्नाच्या भूलथापा देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे.

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेव्हणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बबन भालेराव (वय २९, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मावस मेव्हणीसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवले. मेव्हणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणी पीडितेने ११ ऑगस्टला एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

 

 

अभिप्राय द्या..