हळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

हळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..

कुडाळ/-

न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर रक्ताची गरज ओळखुन हळदिचे नेरूर माजी विद्यार्थी संघाच्या वतीने रविवारी ‘रक्तदान शिबीर’ या उपक्रमाचे सामाजिक जाणीवेतुन आयोजन केले.

यावेळी संस्था अध्यक्ष मनोहर दळवी, सरपंच सागर म्हाडगुत, माजी संस्था अध्यक्ष बाळ सावंत, माजी सचिव विश्राम दळवी (गुरुजी), बाबी म्हाडगुत, संचालक वसंत दळवी, सुनिल सावंत, मधुकर परब, वैद्यकीय पथक प्रमुख श्रीम. डॉ. वाडकर, मुख्याध्यापक शंकर कोराणे, प्रमोद म्हाडगुत आदिंसह माजी मुख्याध्यापक जी.एन. कांबळे, सी. एस. सावंत, मोहन पालकर, सी.आर. सावंत, समीर नाईक, गणेश नाईक, उमेश म्हाडगुत, प्रकाश कडव, सतीश राणे, उल्हास राणे आदिंसह रक्तदाते उपस्थित होते.

या उपक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकारातुन शाळे मधील भौतीक सुविधा कशा प्रकारे उभ्या करण्याचा प्रयत्न केला? त्यासाठी भागिरथ प्रतिष्ठानसह विविध स्तरातील दात्यांनी शाळेला कोणत्या प्रकारची मदत केली याबाबतच्या लेखा जोखा माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने भीवा सावंत यांनी मांडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आप-आपली मनोगते व्यक्त केली.संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देवून यथोचित स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजा कविटकर यांनी केले व शेवटी आभार मानले.

अभिप्राय द्या..