मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी, शेतकऱ्यांनी पुढे यावे.;सतीश सावंत

कुडाळ /-

शोभिवंत माशांचे पालन हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. आजच्या आधुनिक युगात मत्स्यपालनाचे महत्व जाणून युवकांनी आणि शेतक-यांनी पुढे यावे. या व्यवसायासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी सहकार्य करील अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी दिली.

कुडाळ तालुक्यातील मुळदे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री माजी मुख्यमंत्री शरद पवार वाढदिवसानिमित्त शरद भवन ट्रस्ट सिंधुदुर्ग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संशोधन संवर्धन प्रकल्प महाविद्यालय मत्स्य उद्यानविद्या महाविद्यालय मुंबई अंतर्गत एक दिवसीय शोभिवंत मत्स्यपालन विषयक कार्यशाळा पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँकेचे संचालक तथा शरद भवन ट्रस्टचे विश्वस्त व्हिक्टर डांटस, जान्हवी सावंत, प्रकल्प प्रमुख व मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. नितीन सावंत व पंचायत समिती सदस्य विनोद आळवे आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन कृषी पशु संवर्धन यासाठी सहकार्य केले जात आहे. खरे तर शोभिवंत मत्स्यपालनसाठी आता शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. कोकण किनारपट्टीला एक वेगळे महत्त्व आहे. येथील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि आता वेगळ्या धर्तीवर मत्स्यपालन व्यवसाय करणे ही सुलभ झाले आहे. हे शोभिवंत मत्स्यपालनच्या माध्यमातून येथील बांधवांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध झाले आहेत.

अभिप्राय द्या..