श्री देवी सातेरी माता ही वारूळातून प्रकट झाली आहे.

कुडाळ /-

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील श्री सातेरी देवीचा उदया सोमवार दि.14 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या श्री देवी सातेरी मातेचे म्हापण येथे भव्य दिव्य असे मंदिर आहे.या ठिकाणी उद्या सोमवारी श्री सातेरी मातेचा वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.मंदिरात देवीचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच देवीची ओटी भरणे,नारळ केळी ठेवणे,नवस फेडण्यासाठी भक्तांची सकाळपासून गर्दी होणार आहे.तर रात्रौ पालखी प्रदक्षिणा नंतर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page