कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे उद्द्या रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर येथे उद्द्या रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूरच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने उद्या रविवार दिनांक १३ डिसेंबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन शिक्षक श्री. दळवी यांच्या हस्ते होणार आहे.अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.राज्यात कोव्हिडमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच इच्छुक रक्तदात्यांनी राजाराम कविटकर आणि भिवा सावंत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..