वेंगुर्ला
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ५५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली.आज कृषी क्षेत्रासह देशामध्ये जी क्रांती झाली आहे,त्याचे सर्व श्रेय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जाते,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा कृषिभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या वाढदिनानिमीत्त आज वेंगुर्ले कुबलवाडा येथील ओंकार मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करून जनसेवा देणाऱ्या १२ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.यावेळी एम.के.गावडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव
नम्रता कुबल,महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे,रयत शिक्षण संस्थेचे संचालक
अँथोनी डिसोझा,माजी सभापती दीपक नाईक,शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर,
डॉ.संजीव लिंगवत,युवती जिल्हाध्यक्ष निता परब,युवती कार्याध्यक्ष संपदा तुळसकर आदी पदाधिकारी तसेच नितीन कुबल,
मकरंद परब,दीपिका राणे,वामन कांबळे,रोहन वराडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी एम.के.गावडे यांनी विविध १२ क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार हा स्तुत्य उपक्रम असून यामुळे समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा मिळते,असे म्हटले.एम.के.गावडे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्यिक -वीरधवल परब,क्रीडा – जयवंत चुडनाईक,आरोग्यसेविका विनिता तांडेल,पोलिस रुपाली वेंगुर्लेकर, कला – बबन पडवळ,पत्रकार भरत सातोस्कर,पोस्ट खात्यातील राजू निनावे, स्वच्छता कर्मचारी किशोर जाधव आदींसह १२ जणांचा शाल,श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.नम्रता कुबल,रेवती राणे,दीपक नाईक,डिसोझा आदींनी मार्गदर्शन केले.प्रास्तविक व सूत्रसंचालन डॉ.लिंगवत व आभार निता परब यांनी मानले.