करूळ गावातील वीजपुरवठा दिवसभर खंडित.

वैभववाडी:
करूळ जामदारवाडी येथे मुख्य मार्गावरील वीज वाहिन्या कंटेनरच्या धक्क्याने तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कंटेनरचा करूळ बँक नजीकच्या वीज वाहिन्यांना जोरदार धक्का बसला. या धक्क्यात वीजवाहिन्या तुटून खाली रस्त्यावर पडल्या. शिवाय तीन वीज खांब पूर्णता वाकले आहेत. वीज वाहिन्या तोडून फरार झालेल्या कंटेनर चालकाला करूळ घाट मार्गातून परत घटनास्थळी पोलिसांच्या मदतीने माघारी आणण्यात आले. नुकसान भरपाईची मागणी वीज वितरण त्या चालकाकडे करत आहे. नुकसान भरपाई न दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. परंतु उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सदर वीजवाहिन्या नजीक कोणतीही गार्डींगची व्यवस्था करण्यात आली नव्हती. सदर वाहिन्या उंचीवर घ्या किंवा गार्डींग बसवा अशी मागणी यापूर्वी ग्रामस्थांनी केली होती. परंतु या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ही घटना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page