अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यामुळे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले असून मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका मेहता यांनी गोड बातमी दिली असून त्यांना पुत्ररत्न झालं आहे. अंबानी कुटुंबाकडून एक निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती देण्यात आली आहे. नवजात बाळ आणि श्लोक अंबानी दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

आकाश आणि श्लोका या दोघांचे ९ मार्च २०१९ रोजी लग्न झाले होते. दरम्यान गुरूवारी सकाळी ११ वाजता एका गोड बाळाला जन्म दिला. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. “भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाले आहेत. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे ते खूप आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहर घेऊन आला आहे.”, असे अंबानी कुटुंबाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

आकाश-श्लोका यांची शाळेपासूनची ओळख
मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका यांचा विवाह सोहळा २०१९ साली झाला. हे दोघेही शाळेपासूनच एकमेकांना ओळखत होते. त्यांनी आपलं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनेशनल स्कूलमधून पूर्ण केले. श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्समध्ये लॉ शिकली आहे. तिने लॉमध्ये मास्टर्स डिग्रीही मिळवली आहे. श्लोकाने २०१५ मध्ये कनेक्ट फॉर नावाने एक एनजीओ देखील सुरु केली होती.

आकाश आणि श्लोका यांनी लग्न केल्यानंतर त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा जगभरात झाली होती. याचं लग्न होण्यापूर्वी त्याचं प्रीवेडिंग सेलिब्रेशन स्वितर्झलँडमध्ये करण्यात आले होते.

 

अभिप्राय द्या..