कुडाळ /-
भारतीय जनता पक्षाचे सदस्य व गोठोस ग्रामपंचायत माजी सदस्य रवी राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरआयोजित करण्यात आले आहे. रवी राऊळ यांच्या वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सेवाभावी उपक्रमांची रेलचेल असते.कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रवी राऊळ यांच्या वाढदिनी होणारे सर्व कार्यक्रम साधेपणाने करण्यात येणार आहेत,१० डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीर होणार आहे.सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे प्रकाश मोर्य मित्रमंडळाने आवाहन केले आहे.आपल्या लाडक्या सामाजिक कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी रवी राऊळ प्रेमींची गर्दी उसळत असते.कोरोनाच्या प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.उद्या गोठोस येथे रक्तदान शिबिर सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळून होणार आहे,असे रवी राऊळ मित्रमंडळ व प्रकाश मोर्ये मित्रमंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.