कुडाळ बाजारपेठेतील रहाणारे कै.देवेंद्र संजय पडते यांचे दुःखद निधन..

कुडाळ बाजारपेठेतील रहाणारे कै.देवेंद्र संजय पडते यांचे दुःखद निधन..

देवेंद्रच्या अकाली जाण्याने कुडाळ बाजारपेठेसहित कुडाळ शहरात हळवलं वेक्त केला जात आहे..

कुडाळ /-

कुडाळ शहरातील ,बाजारपेठ कुडाळ येथे रहाणारे कै.देवेंद्र संजय पडते वय वर्ष २७ याचे काल रात्री गोवा येथील मणीपाल या खासगी हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले आहे.कै.देवेंद्र, हा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा एकुलता एक मुलगा होता. देवेंद्रच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील आई,वडील,बहीण व ईतर नातेवाईक मंडळी यांना धक्का बसला आहे.देवेंद्रच्या या बातमीने कुडाळ तालुक्यासहित कुडाळ बाजारपेठेत हळवलं वेक्त केला जात आहे.देवेन्द्र याला चांगले भजन म्हणण्याची आवड होती,देवेंद्र आपल्या श्रुषाव्या वाणीतून वेगवेगळी भक्ती पर गीते,भजने म्हण|यचा आणि सर्व भजनी मंडळींना आनंद द्यायचा .त्याच्या या जाण्याने सर्व मित्र मंडळी,भजनी कलाकार यांच्यावर एक दुःखाचे सावट निर्माण झाले आहे.कै.देवेन्द्र पडते,याची अंत्य यात्रा आज गुरूवार दिनांक 10डिसेंबर रोजी ठीक दुपारी 12-30 वाजता कुडाळ बाजारपेठ येथील घराकडून निघेल.

अभिप्राय द्या..