कुडाळ-मालवण,कट्टा रस्ता तात्काळ डागडुजी करा.;राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद घाडगे इशारा

कुडाळ-मालवण,कट्टा रस्ता तात्काळ डागडुजी करा.;राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद घाडगे इशारा

 

कुंडाळ ते मालवण कट्टा हा रस्ता गेले अनेक महिने अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी कारभारामुळे वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा.अन्यथा आंदोलन करू,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी दिला आहे. या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.कुडाळ ते मालवण हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून नेहमी वाहनांची खूप ये-जा चालू असते. वाहन चालवताना रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ता आहे.हेच समजत नाही.एक खडा चुकवायला गेलात कि दुसऱ्या खड्यामध्ये वाहन जाते.त्यामुळे अपघात होता होता वाहनधारक स्वतःला अपघातापासून वाचवतात.तरीही बांधकाम विभागाचा जरा ही लक्ष या अपघात ग्रस्त रस्त्यावर नाही.हे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शोभनीय नाही.आता बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आठ दिवसांत निर्णय घ्यावा. अन्यथा पूर्व कल्पना न देता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बांधकाम विभागाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले जाईल.आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग राहिल,असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..