वेंगुर्ला-भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील मंदिर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. याचा शुभारंभ विठ्ठल रखुमाईला श्रीफळ देऊन करण्यात आला. भुजनागवाडी येथे पुरातन असे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिरात एकादशी, भजनी सप्ताह, राम नवमी, काकड आरती असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. सदरील मंदिराची दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम गेल्यावर्षीपासून हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात गाभारा व मंदिरातील आतील भागाला लादी बसविण्याचे काम भाविकांच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. दरम्यान, पावसाळ्यात होणारी मंदिरातील गळती लक्षात घेऊन छप्पराच्या कामाला प्रारंभ केला आहे. भाविकांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.