कुडाळ तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने तेली समाजाचे दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती श्री.भवानी मंदिर तेलीवाडी,वेताळबांबार्डे येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कुडाळ ता.अध्यक्ष श्री.दिलीप तिवरेकर, सचिव अमित धामापुरकर, पंचायत समिती सदस्य सौ.सुप्रिया वालावलकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुभाष कांदळकर,सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईनाथ आंबेरकर,श्री.सातार्डेकर व असंख्य ज्ञाती बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भालचंद्र आजगावकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे व ज्ञाती बांधवांचे आभार ता.सचिव अमित धामापुरकर यांनी मानले.