पळसंब जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेष्ठांचा मेळावा
जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबची सभा जयंती देवी मंदिर येथे अध्यक्ष श्री सिताराम पुजारे (दादा गावकर ) यांच्या अध्येक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पळसंब सरपंच चद्रकांत गोलतकर , देवस्थान मानकरी श्रीप्रकाश कापडी ,उपाध्यक्षा रतीका गोलतकर, सचिव विश्वनाथ गोलतकर,
जेष्ठ नागरिक संघ मालवणचे राम धनावडे , सुहास मांजरेकर , सतीश कदम, रमेश परब , प्रमोद सावंत , सुरेश गावकर ,राजन पुजारे , मधुकर कदम , इत्यादी पळसंब मधील सर्व जेष्ठ नागरिक मोठया सख्येने उपस्थित होते
त्यावेळी जेष्ठ नागरिक सघांच्या वतीने सरपंच चद्रकांत गोलतकर आणि श्री . धनावडे याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला , तसेच जेष्ठ नागरिक सघ मालवणचे श्री . राम धनावडे यानी जेष्ठ नागरिकाना शासनाच्या योजना त्याचे फायदे याविषयी माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिक संघ मालवण आपल्या पाठीशी आज पासून मोठ्या ताकदीने उभा राहिल असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे सुहास मांजरेकर, श्री कदम , श्रीप्रकाश कापडी , रमेश परब यानी मनोगत व्यक्त केले , तसेच पळसंब सुपुत्र श्री .गिरीधर पुजारे यानी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व जेष्ठ नागरिकांना सोलापुरी चादर वाटल्या. पुजारे यांचे बंधू राजन पुजारे याचा शाल श्रीफळ देवून संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद सावंत यानी केले