युवानेते वेंगुर्ला निरीक्षक‌ संदेश पारकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मठ येथे शिवसेना सभासद नोंदणी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सभासद नोंदणी अभियान एक चळवळ म्हणून करा. तुम्ही आज घेतलेली मेहनत यश मिळवून देणार, तर संदेश पारकर यांनी सभासद नोंदणी प्रामाणिकपणे करा त्यात यश मिळत राहील जसे की आज शिवसेना पक्षाने पुन्हा उभारी घेतली आहे आणि आपले पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा लाभ आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपली संघटना मजबूत हवी, तेव्हा जास्तीत जास्त सभासद नोंदणी करा, असे आवाहन केले.तसेच उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, बाळा दळवी, तालुका प्रमुख
यशवंत परब,सभापती अनुश्री कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, विभाग प्रमुख उदय गोवेकर, उपविभाग प्रमुख शाम नाईक,प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, सतिश परब, संतोष कासले,निलेश नाईक, नित्यानंद शेणई,बाळा गावडे मनोहर गावडे, बाबा वराडकर आदी पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page