उभादांडा येथील सुखटनवाडी येथे गवताच्या गंजीना आग..
शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान..
उभादांडा सुखटनवाडी येथील जुवावं ब्रिटो यांच्या गवताच्या सात मोठ्या गंजी व 22 लाटे आज दुपारी 2 वा. सुमारास आग लागून जळून खाक झाल्या आहेत. यात त्यांचे सुमारे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु आगीने उग्र रूप धारन केले होते. यावेळी विनायक रेडकर, सिरील आल्मेडा, सुनील कांबळी, सुशील रेडकर, बाबल आल्मेडा, ऑल्विन फर्नांडिस, एल्लन फर्नांडिस, एगिमा ब्रिटो, अलेक्स फर्नांडिस, पीटर ब्रिटो, यांनी सामाजिक कार्यकर्ते शिवसेना विभाग प्रमुख कार्मीस आल्मेडा यांना कल्पना देण्यात आली होती. आल्मेडा यांनी उभादांडा तलाठी सायली आंदुर्लेकर यांना याबाबत कल्पना देऊन पंचनामा करून घेतला व नुकसान भरपाई जास्तीत जास्त देण्याची विनंती केली आहे. जुवाव ब्रिटो यांची बैल असून त्यांना देखील गवत शिल्लक राहिले नाही आहे.