मालवण /-
टाळे बंदीनंतर काही शालेय एसटी बसफेऱ्या वगळता येथील आगाराच्यावतीने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हातंर्गत बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.
यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बेळगाव, बार्शी, निगडी-पुणे, रत्नागिरी, तुळजापूर, मुंबई, बोरिवली, कोल्हापूर, पणजी यासह कणकवली व्हाया आचरा, असगणी, बेळणे, कसाल, कुडाळ व्हाया वराड, पेंडूर, धामापूर, देवगड व्हाया आचरा, कसाल, वेंगुर्ले, श्रीरामवाडी व्हाया म्हापण, पेंडूर, कुडाळ, कसाल व्हाया खोटले, हिवाळे, भगवंतगड- आचरा, देवली व्हाया वायरी, चौके, मसुरे व्हाया कांदळगाव, पोईप, आचरा, मिठबाव व्हाया आचरा, पोयरे, डांगमोडे व्हाया बागायत, कांदळगाव, बागायत व्हाया आंबडोस, केरवडा व्हाया म्हापण, वेंगुर्ले, कुडोपी व्हाया तळाशील, आचरा, आंबेगाव व्हाया कसाल, सावंतवाडी, बेळणे व्हाया राठीवडे, सावंतवाडी व्हाया धामापूर, कुणकेश्वर व्हाया आचरा, देवबाग व्हाया तारकर्ली या बसफेऱ्यांचा समावेश आहे. अशी माहितीही श्री. बोधे यांनी दिली.