कुडाळ/-
शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तब्बल सोळा जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे असलेली पाच दुचाकी, एक रिक्षा, सहा बंदुका , सात काडतूसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल मध्यरात्री उशिरा बाव देउळवाडी येथे करण्यात आली. त्यातील संशयितांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबतची माहीती ठाणे अमंलदार स्नेहा गवस यांनी दिली.