चौके /-

मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवासी गणपत काशिराम गावडे ( वय- ८२) यांचे आज शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. चौके येथील पत्रकार नितीन गावडे यांचे ते वडील होत. गणपत गावडे हे पूर्वीच्या काळी बैलगाडी व्यावसायिक होते. या बरोबरच त्यांनी शेती, चिरेखाण व्यवसाय करून परिसरात नावलौकिक मिळवला होता. चौके गावात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. गेले काही महिने वृद्धापकाळाच्या आजाराने ते त्रस्त होते. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चौके येथील चिरेखाण व्यावसायिक बी. जी. गावडे, दत्ता गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगे बिजेंद्र, दत्तात्रय, नितीन, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page