वेंगुर्लेतिल ठुम्बरे कुटुंबियांना आमचा रामघाटच्या वतीने मदतीचा हात..

वेंगुर्लेतिल ठुम्बरे कुटुंबियांना आमचा रामघाटच्या वतीने मदतीचा हात..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला मधील आमचा रामघाटच्या वतीने ठुम्बरे कुटुंबियांना दिला मदतीचा हात.येथील रामघाट मधील छोट्या मुलांनी किल्ला बनवताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करायचे ठरवले व जे पैसे फंडपेटीत जमा होतील ते सर्व पैसे मदत म्हणुन करायचे असे ठरवले .त्याच दरम्यान वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली की गुरुनाथ ठुम्बरे यांचे झाडावरून पडून निधन झाले व त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत हे समजताच त्यांना खारीचा वाटा मदत म्हणून फंडपेटीतील जमलेली रक्कम रु ८०००/- ची आर्थिक मदत ठुम्बरे कुटुंबियांना केली.यामुळे रामघाट वासीयांनी समाजामध्ये सामाजिक बांधिलकीचे एक उदाहरण ठेवले आहे तसेच जे कोण दानशूर व्यक्ती अथवा संस्था असतील त्यांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन रामघाट वासीयांनी केले आहे.

अभिप्राय द्या..