वेंगुर्ला /-
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे येथील ग्रामीण रुणालयात तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. आज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात तालुक्यातील पत्रकारांची रक्तदाब, मधूमेह वगैरे मोफत तपासणी ग्रामीण रुणालयाचे वैद्यकीय अधिकारी पंडीत डवले, डॉ. प्रल्हाद मणचेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यावेळी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष के. जी. गावडे, उपाध्यक्ष प्रदिप सावंत, सचिव दाजी नाईक, जिल्हा कार्यकारीणी सदस्य भरत सातोसकर, तसेच एस. एस. धुरी, विनायक वारंग, प्रथमेश गुरव, अजित राऊळ, योगेश तांडेल आदी उपस्थित होते. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. मणचेकर व डॉ. डवले यांनी पत्रकारांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.