पुळास बिब्याचीवाडी सौ.पुर्वा गावडे बेपत्ता.;कुडाळ पोलिसांची माहिती..

पुळास बिब्याचीवाडी सौ.पुर्वा गावडे बेपत्ता.;कुडाळ पोलिसांची माहिती..

कुडाळ /-

पुळास बिब्याचीवाडी येथे माहेरी राहत असलेली महिला सौ. पुर्वा प्रविण गावडे (२८) ही आपल्या माहेरच्या घरातून बेपत्ता झाली आहे. ही घटना मंगळवारी दि.१ डिसेंबर रोजी दु. २.३० वा घडली आहे. सौ पुर्वा गावडे ही महिला गेले दोन वर्षे पासून आपल्या पुळास बिब्याचीवाडी येथील माहेरी राहत आहे.दरम्यान १ डिसेंबर रोजी दु. २.३० वा. च्या सुमारास ही महिला घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. दरम्यान तिचा गेले दोन दिवस तिचा सर्वत्र शोध घेऊनही कोणतीच माहिती मिळाली नाही. अखेर वडिल अंकुश काशिराम राणे यांनी कुडाळ पोलिसात गुरूवारी ही महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद कुडाळ पोलिसात नोंदवली आहे .या घटनेचा अधिक तपास पो हे काँ एच सी धोत्रे करत आहेत.

अभिप्राय द्या..