कुडाळ शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ..

कुडाळ /-

शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी शुभारंभ करत असताना टार्गेट ठेवून काम करा. कुडाळ शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचवा शिवसैनिकांनी एक दिलाने एका विचाराने काम करून प्रत्येक घराघरात शिवसेनेचा सदस्य बनवा .शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले.

यावेळी पडते म्हणाले कुडाळ तालुक्याबरोबरच कुडाळ शहरात विकास कामांसाठी कोट्यावधी निधी हा आमदार ,खासदार ,पालकमंत्री यांच्या माध्यमातून शहरात देण्यात आला ..जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून सिंधुदुर्ग वासियांची स्वप्नपूर्ती ठाकरे सरकारच्या माध्यमातून होत आहे.आमदार ,खासदार ,पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने झालेली प्रत्येक विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचावणे हे आपले काम आहे .

यावेळी उपजिल्हाउपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत ,महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत,तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोबाटे,,उपसभापती जयभारत पालव,अतुल बंगे ,शहरप्रमुख संतोष शिरसाठ,युवासेना शहर प्रमुख कृष्ण तेली,युवासेना जिल्हा समन्वय सुशील चिंदरकर,नगर सेवक बाळा वेंगुर्लेकर,सचिन कळप ,जीवन बांदेकर,श्रेया गवंडी ,प्रज्ञा राणे,मेघा सुकी,उदय मांजरेकर,चेतन पडते,राजू गवंडे व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थति होते.

अभिप्राय द्या..