कणकवली /-
राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांची नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या गावसभेत हा निर्णय घेण्यात आला. १० वर्षानंतर नव्या कार्यकारिणीच्या फेरनिवडीसाठी हि सभा घेण्यात आली होती. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात कुर्ली गावाचे विस्थापन झाले. फोंडा गावच्या माळावर नवीन कुर्ली गाव वसला. यावेळी गावच्या समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने २० वर्षांपूर्वी नवीन कुर्ली विकास समितीची स्थापना करण्यात आली. १० वर्षांपूर्वी अनंत पिळणकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर सलग १० वर्ष अनंत पिळणकर या समितीचे अध्यक्ष होते. गावच्या विकासाचे अनेक प्रश्न या समितीने मार्गी लावले. गावात ग्रामपंचायतीचा प्रश्न अजूनही शासन दप्तरी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र त्यामुळे गाव थांबला नाही. नवीन कुर्ली विकास समितीने विविध पातळ्यांवर गावच्या विकासाचे प्रश्न लावून धरले. आज याच समितीच्या अध्यक्षपदी अनंत पिळणकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न येत्या काही महिन्यात आपण शासन स्थरावर पाठपुरावा करून मार्गी लावू. मात्र ग्रामपंचायत नसली तरी गावचा विकास थांबू देणार नाही असा विश्वास त्यांनी गाववासीयांना यावेळी दिला आहे. यावेळी नवीन कुर्ली विकास समितीच्या उपाध्यक्ष पदी सेनापती रामचंद्र सावंत, सचिव सुनील निवृत्ती गोसावी, सहसचिव रघुनाथ कुलकर्णी, सल्लगार शिवाजी विष्णु चव्हाण, सदस्य स्नेहा सेनापती सावंत, पूजा दिनेश चव्हाण, आत्माराम तेली, दिलीप वैराग, दीपक चव्हाण, दाजी सुतार, अरुण चव्हाण, सखाराम हुंबे, प्रकाश मडवी, उत्तम तेली, दिगंबर सुतार, चंद्रकांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी मोतीराम तेली ,दिनेश तेली, पांडुरंग पार्टे, हर्षद चंदुरकर, शंकर राणे, जयेश परब, देवेंद्र पिळणकर यांच्यासह गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.