लवकरात,लवकर कुडाळ बस स्थानक प्रवाश्यांना योग्य सुख,सोईनी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन.;मनसेचा ईशारा..

लवकरात,लवकर कुडाळ बस स्थानक प्रवाश्यांना योग्य सुख,सोईनी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन.;मनसेचा ईशारा..

कुडाळ /-

कुडाळ एसटीच्या बस स्थानका समोर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगारसेने तर्फे ,मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.जे.डी. उर्फ.बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.मनसेनेचे पदाधिकारी एकत्र येत ,कुडाळ एसटी बस स्थानकातील मैदानात बॅट, बॉल च्या सहाय्य|ने क्रिकेट खेळण्यात आला. हा खेळ जवळपास अर्धा तास खेळ मनसेच्या पदाधिकारी यांनी चालूच ठेवला..हे आंदोलन मनसेने कुडाळ बस स्थानकात होणारी प्रवाशी यांची गैरसोय, लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आणण्यासाठी केले आहे.

कुडाळ येथील बस स्थानकात गुरे,ढोरे,कुत्रे यांच्यासाठी हे जवळपास अडीच कोटीचे बस स्थानक बांधले आहे.?असा मनसेच्या पदाधिकारी यांनी डेपो मॅनेजर डोंगरे यांनी घटनास्थळी भेटी लिली तेव्हा मनसे कार्यकर्ते यांनी पाढाच वाचला तसेच रात्री अपरात्रीच्या वेळी या बस स्थानकाचा अनैतिक धंद्यासाठी वापर केला जातो असा आरोप बनी नाडकर्णी यांनी केला.

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब म्हणाले की ,लवकरात लवकर हे बस स्थानक प्रवाश्यांना सुरू करा नाहीतर मनसेच्या माध्यमातून उग्र आंदोनले करू,आणि या मैदानात भविष्यात मनसेच्या वतीने बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा भरवली जाईल, भले शासनाने कारवाई केली,तरी आम्ही सामोरे जाऊ असा ऐशार मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला आहे.तसेच मनसेचे राजन दाभोलकर यांनी सांगितले की,ठराविक कालावधींत हे बस स्थानक सुरू..नाही झाले तर ” खळ खठयाक” आंदोलन केले जाईल असे दाभोलकर यांनी सांगितले.यावेळी मनसेचे धीरज परब ,बनी नाडकर्णी,राजन दाभोलकर , गणेश वाईरकर ,ऍड राजू कासकर , रमा नाईक ,सिद्धेश खुंटाळे, संतोष कुडाळकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..