महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेल्या उभादांडा येथील लिलावती केळुसकर हीचा भाजपाच्या वतीने सत्कार..

महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलेल्या उभादांडा येथील लिलावती केळुसकर हीचा भाजपाच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /-

भारतीय जनता पार्टी – वेंगुर्ले च्या वतीने उभादांडा मांजरेकरवाडी येथील विद्यार्थीनी लिलावती आनंद केळुसकर हीने राष्ट्रपीता ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल माजी प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक,ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर,उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, न्यु.इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, पु.प्रा.शाळा नवाबाग मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, दिपक बोडेकर,किसान मोर्चा चे बाळु प्रभु,भाऊ केरकर, शिवदास मांजरेकर,भानुदास मांजरेकर,उल्हास गिरप,मृन्मयी केरकर, प्राची गिरप, रामकृष्ण केळुसकर,आनंद केळुसकर , प्रशांत केळुसकर,अमिता नाईक आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..