कुडाळ /-

भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांना क्विंटलमागे १८१५ रु हमीभाव देण्यात आला होता. तसेच त्यावर ७०० रु बोनस मिळून २५१५ रु दर देण्यात आला होता. यावर्षी शासनाने हमीभावात ५३ रु रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव लागू करण्यात आला आहे. तसेच गतवर्षी प्रमाणे ७००रु बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे २५६८ रुपये दर मिळणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या भात खरेदी केंद्रावरच भात विक्री करावी.राज्य सरकार आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेतकऱ्यांना बळकट करण्यावर भर देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले सरकार शेतकरी हिताचे आहे. असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.बजाज सिंधुदुर्ग राईस मिल, कुडाळ खरेदी विक्री संघ, व आंब्रड सोसायटीच्या माध्यमातून आंब्रड येथे भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज या भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना उपतालुकासमन्वयक दिनकर परब, विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली,उपसरपंच विजय परब, कुंदे सरपंच सचिन कदम, आंब्रड सोसायटी अध्यक्ष संदीप परब, प्रवीण भोगटे, सीताराम दळवी, आबा मुंज, जया परब, शेखर परब, तात्या आंगणे,सागर वाळके, पंढरी देवळी, अनाजी सावंत, पोलीस पाटील देवेंद्र दळवी, सीताराम दळवी, रमेश परब, अनिल परब, अनंत परब, बाळा पाडावे, नारायण राऊळ, सुरेश मुंज, प्रभाकर मुंज,अरविंद मुंज आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page