कुडाळ /-

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल , कुडाळ या प्रशालेतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 04 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 09 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होऊन एकूण प्रशालेचे 13 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेच्या 53 विद्यार्थ्यापैकी 33 विद्यार्थी पात्र ठरले आहे . त्यापैकी सृष्टी बाळासाहेब केंद्रे ( 83.30 टक्के ) गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत 12 वी आली . तसेच सार्थक संगम कदम ( 79.86 टक्के ) , अथर्व अभिनय आजगांवकर ( 79.16 टक्के ) , स्मितेश विनोद कडोलकर ( 77.08 टक्के ) या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . पूर्व माध्यमिक परीक्षेत प्रशालेतील 49 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी पात्र झाले आहेत . सेजल जयसिंग शारबिद्रे ( 72.10 ) , तन्वी संतोष चिपकर ( 70.06 ) , आर्या दत्तगुरु शिरसाट ( 68.70 ) , विश्वजीत अविनाश परीट ( 65.98 ) गौरांग संदीप मणेरीकर ( 65.30 ) साक्षी प्रेमनाथ दळवी ( 61.10 ) , ग्रीष्मा विक्रांत भोगटे ( 61.22 ) , वैष्णवी राजेंद्र कांबळी ( 59.86 ) व प्रज्ञा चंद्रकांत चव्हाण ( 55.78 ) या नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे . या सर्वांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभूवालावलकर , उपमुख्याध्यापक मनोहर गुरबे व राजकिशोर हावळ , पर्यवेक्षक शरद धामणेकर , अनंत जामसंडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page